Pune Crime News : पुढे पोलीस आहेत अंगावरील दागिने काढून ठेवा, म्हणाला अन् मंगळसूत्र घेऊन पळाला

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पुण्यात सोनसाखळी ( Pune Crime News)चोरीच्या घटना सुरू आहे. एकट्या दुकट्या असलेल्या महिलांना हेरून, पत्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. एका ज्येष्ठ महिलेला “पुढे पोलीस आहेत तुम्ही अंगावरील दागिने काढून ठेवा” असे सांगून त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

Pune Crime News : 8 वर्षीय मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवत अनैसर्गिक अत्याचार; पर्वती दर्शन परिसरातील तीन तरुण अटकेत

रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोअर इंदिरानगर येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी एका 59 वर्षे महिलेने तक्रार दिली आहे. यानुसार दोन अज्ञात इस्मान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या लोअर इंदिरानगर येथील स्वामी समर्थ मंदिराजवळील महेश सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्याकडे आले. त्यांनी फिर्यादीला “पुढे पोलिस आहेत, तुम्ही अंगावरील दागिने काढून ठेवा असे सांगितले”.

त्यांचे  गळ्यातील एकूण तीन लाख 85 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र काढत असतानाच आरोपीने ते मंगळसूत्र बळजबरीने खेचून काळ्या रंगाच्या ( Pune Crime News) दुचाकीवरून पळून गेले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.