Rahatni : कन्या क्रमांक 55 या शाळेत शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया

एमपीसी न्यूज : लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेचा संस्कार मुलांवर होण्यासाठी, पीसीएमसी पब्लिक स्कूल रहाटणी (Rahatni ) कन्या शाळा क्रमांक 55 या शाळेत शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

Pimpri : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे लागली पवनामाईची वाट

उमेदवार निवड, आचारसंहिता, प्रचार, प्रत्यक्ष निवडणूक असा सर्व कार्यक्रम पार पडला. यावेळी मतदान अधिकारी व कर्मचारी म्हणून मुलींनीच भूमिका बजावली.

याप्रसंगी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापिका अलका ताठे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत चौगुले होते.  वैशाली वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. मतमोजणी अधिकारी साहेबराव धुमाळ, शंकर पवार यांनी व इतर सर्व शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.