Shirur Loksabha Election : शिरुर लोकसभा मतदारसंघात ग्रामस्थांकडून मतदानाचा संकल्प

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणूकीत  मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप पथकामार्फत मतदान (Shirur Loksabha Election)जनजागृती करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील ग्रामस्थांनी मतदान करण्याचा संकल्प केला. 
आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. निरगुडसर येथे स्वीप पथकाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने ग्रामस्थांकडून मतदान संकल्प पत्र भरुन घेतले.
शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या आणि मतदानाचे महत्व पटवून दिले. तसेच मतदान करण्याविषयी मार्गदर्शन केले आणि मतदान करण्यासाठी आवाहन केले.

पंडित नेहरु विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोहे खुर्द गावात मतदान संकल्प पत्राचे वाटप केले आणि पालकांकडून मतदान करण्याचे संकल्प पत्र भरुन घेतले. निरगुडसर येथील पंडित नेहरु विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही  पालकांकडून मतदान करण्याचे संकल्प पत्र भरुन घेतले.

आंबेगाव विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील मंचर येथे महात्मा गांधी विद्यालयाचे सुमारे शंभर विद्यार्थी मतदान जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी पालकांकडून आणि परिसरातील ग्रामस्थांकडून मतदान संकल्प पत्र भरुन घेतले.
मतदान जनजागृती उपक्रमात स्वीप पथकाने विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेतल्याने त्यांनाही लोकशाही प्रक्रियेचे महत्व समजण्यास मदत होत आहे आणि युवा मतदारांनाही प्रोत्साहन मिळत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.