alandi news : आळंदी मध्ये श्री संत जलाराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज : श्री संत जलाराम जयंती उत्सवानिमित्त आळंदी शहरात सोमवारी सकाळी दहा वाजता श्री संत जलाराम मंदिर पासून ठिक ठिकाणी श्री संत जलाराम बाप्पा यांची बँन्डच्या वाद्यात शोभायात्रा काढण्यात आली.

ncp chief sharad pawar hopitalised : शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात केले दाखल

आकर्षक अश्या फुलांनी सजविलेल्या वाहनावर जलाराम बाप्पा यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती.या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने जलाराम बाप्पा भक्त उपस्थित होते.श्री जलाराम मंदिरामध्ये विविध फुलांची फुलसजावट व आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.मंदिरा मध्ये महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.यावेळी या संस्थांचे पदाधिकारी मान्यवर व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.