Molestation case : तरुणीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शहरात नवीन असलेल्या तरुणीला फिरायला नेऊन तिच्याशी लगट करत तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 29) हिंजवडी येथे घडली.

मनोज वात्रे (रा. नेरे दत्तवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शहरात नवीन आहेत. त्यांना इथले काहीही माहिती नाही, याचा आरोपीने गैरफायदा घेतला. फिर्यादीस लक्ष्मी चौक हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये आणि त्यांनतर पवना धरणावर फिरायला नेऊन तिथे त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. फिर्यादीच्या वडिलांच्या नावावर आलेले डेबिट कार्ड आरोपीने तोडले. तसेच फिर्यादीच्या होणाऱ्या पतीच्या नावावर असलेले क्रेडिट कार्ड आरोपीने गहाळ केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.