Talegaon : भाजप युवा मोर्चातर्फे मार्गदर्शन शिबिर व गुणवंत विद्यार्थी सत्कार

एमपीसी न्यूज – जीवनात कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी केवळ कागदावरचे मार्क महत्वाचे नाही. टक्केवारीवर गुणवत्ता ठरवू नका, स्वतःमधील कलागुण ओळखा. उच्च गुण प्राप्त करणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होतोच असे नाही यासाठी बुद्धिमत्ता आवश्यक आहे. आपली बुद्धिमत्ता कोणत्या क्षेत्रात चालते हे ओळखता आले तर ख-या अर्थाने तुमच्या करियर वाटा मोकळ्या होतील, असे मत आमदार बाळा (भाऊ) भेगडे यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता विद्यार्थी आघाडी तळेगाव दाभाडे शहर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. आमदार संजय (बाळा) भेगडे व नगरसेवक गणेश भेगडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.  

यावेळी उपनराध्यक्ष सुनिल शेळके यांनी फाकटकर सर यांच्या सारख्या शिक्षकांची समाजाला गरज आहे तसेच फाकटकर सरांनी नापासाची शाळा सुरु करुन असंख्य मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षित करुन तालुक्यातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे महान कार्य करत आहे असे मत व्यक्त केले. शहर भाजपा कार्यअध्यक्ष र्श्री रविंन्द्र आवारे व श्री नितीन फाकटकर सर यांनी मनोगत व्यक्त केले.  

तसेच तळेगांव दाभाडे शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव नगरसेवक सुशील सैंदाणे, संदीप शेळके, अरुण भेगडे, श्रीराम कुबेर, शोभा भेगडे, कल्पना भोपळे, संध्या भेगडे, प्राची हेंन्द्रे, मंगल जाधव, हेमलता खळदे भाजपा शहर अध्यक्ष संतोष दाभाडे, भास्कर भेगडे, रविंद्र माने, निलेश मेहता, मोहिनीताई भेगडे, चारुशीला काटे यांच्या हस्ते निकीता युवराज पाटील, मृणालीनी अरुण मोडक, पार्थ ठोबळे यांचा करण्यात आला. स्वागत गोकुळ किरवे यांनी केले प्रास्तविक विनायक भेगडे यांनी केले व आभार सागर खोल्लम, सुनील कांबळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.