Pune : पावसाळ्यामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज – महावितरण

एमपीसी न्यूज – पुणे परिमंडळ अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांमध्ये सुमारे 4 हजार 575 अभियंते, तांत्रिक कर्मचारी तसेच दुरुस्ती कामासाठी नेमलेल्या कंत्राटदारांचे कर्मचारी आवश्यक साहित्य व साधन सामग्री सह  महावितरण सज्ज असल्याचा विश्वास महावितरण तर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

Pune : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे पीडीत तस्करीसाठी जनजागृती कार्यक्रम

पावसाळ्यातील नियोजनाबाबत मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी नुकताच आढावा घेतला. सुरळीत वीजपुरवठ्या साठी सर्व विभागातील अभियंता, कर्मचाऱ्यांनी सतर्क व तत्पर राहावे. मुसळधार पाऊस व अन्य संबंधित कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा कालावधी कमीत कमी असावा. त्यासाठी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठ्याची सोय करावी आणि वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे कामे देखील वेगाने करावेत असे निर्देश त्यांनी दिले.

मुख्य अभियंता पवार म्हणाले, की पावसामुळे वीज यंत्रणेतील संभाव्य बिघाड टाळण्यासाठी तत्परतेने उपाययोजना कराव्यात. तांत्रिक बिघाड गंभीर असल्यास संबंधित अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यास वेग द्यावा. खंडित वीजपुरवठ्याबाबतची माहिती ग्राहकांना देण्यासोबतच विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षेबाबत जागरूक राहून यंत्रणेच्या दुरूस्तीचे काम करावे असे निर्देश पवार यांनी दिले.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर प्राथमिक चाचणी घेतली जाते. त्यामधून वीज सुरळीत झाली नाही तर लगेच पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु केला जात आहे. पर्यायी व्यवस्था नसल्यास दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जॉईंट देणे आदी कामे करावी लागत आहेत. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे पाण्याचा उपसा करून ही कामे करावी लागत आहेत.

भूमिगत वीजवाहिनी कॉन्क्रीट रस्त्याखाली किंवा रस्त्याची उंची वाढल्याने खूप खोल असल्यास वेगळी वीजवाहिनी टाकून वीजपुरवठा सुरु करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच उपरी वीजवाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्यास ती बाजूला करणे, नवीन वीजतार टाकणे, पीन किंवा डिस्क इन्सूलेटर बदलणे आदी कामे करण्यात येत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.