Talegaon : तळेगाव खिंडीत दुचाकीस्वाराला उडवले

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरातून उरसे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर ( Talegaon) खिंडीमध्ये एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना आज (मंगळवारी, दि. 11) सकाळी घडली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
अमित यादव (रा. तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमित यादव हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14/एफवाय 0119) तळेगाव दाभाडे ते उर्से यादरम्यानच्या मार्गावरून जात होते. ते खिंडीमध्ये आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. वाहनाच्या धडकेत अमित यादव रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात ( Talegaon) आले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.