Pune News : पुणे पोलीस दलातील हॉकीपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज-पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी (Pune News) सोनू सकट (वय 37) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सकट हाॅकीपटू होते. सकट यांचे अकस्मात निधन झाल्याचे समजताच पोलीस दलात शोककळा पसरली. पोलीस कर्मचारी सोनू सकट चतु:शृंगी पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. गेल्या काही दिवसांपासून ते अर्जित रजेवर होते. रविवारी मध्यरात्री त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Talegaon : तळेगाव खिंडीत दुचाकीस्वाराला उडवले

उपचारादरम्यान सकट यांनी हृदयविकाराचा झटका आला. सकट यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी जाहीर केले. सकट यांनी राष्ट्रीय पातळीवर हाॅकी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. हाॅकीपटू सकट यांचे निधन झाल्याचे समजताच पोलीस दलात (Pune News) शोककळा पसरली. पोलीस आयुक्त रितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.