Pune News : तीन लाख रुपयांसाठी छळ; नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज-पती तसेच सासरच्यांनी ठरविलेले तीन लाख रुपये माहेरहून आणावे, यासाठी विवाहितेचा ( Pune News )अमानूष छळ करण्यात आला या त्रासाला कंटाळून 27 वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

पूजा प्रणव काळे (वय 27, रा. फुरसुंगी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी पती प्रणव रामदास काळे (वय 30, रा. मलकापुर, अमरावती) याला अटक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पतीसह इतर नातेवाईकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Pune News : पुणे पोलीस दलातील हॉकीपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

याबाबत पूजा यांचे वडिल किशोर खेडकर (वय 50) यांनी तक्रार दिली आहे. पूजा व प्रणव यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. दरम्यान, पती व इतरांनी त्यांना माहेरहून मागणी केलेले ३ लाख रुपये घेऊन येण्यासाठी त्रास देत होते. त्यांनी पैसे आणण्यास नकार दिल्याने त्यांचा मानसिक व शारिरीक छळ केला. या छळाला कंटाळून पूजा यांनी राहत्या घरी गळफास ( Pune News ) लावून आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.