Talegaon Dabhade : सर्वसामान्यांच्या हितासाठी काँग्रेसने पक्ष संघटना बळकट करावी – सचिन सावंत

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आढावा बैठक

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही रुजविण्याचे (Talegaon Dabhade) महत्वाचे काम काँग्रेस पक्षाने केले. सध्या देशात लोकशाही नष्ट करण्याचे काम होत आहे.देशातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करणे महत्वाचे असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले.

मावळ तालुका काँग्रेस आय पक्षाच्या वतीने आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत तळेगाव येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रवक्ते सावंत हे मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार रविंद्र धंगेकर,पिंपरी चिंचवड काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलास कदम, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर,जेष्ठ नेते रामदास काकडे, ॲड दिलीप ढमाले, तळेगाव शहर अध्यक्ष यादवेंद्र खळदे, मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ,महिला अध्यक्षा प्रतिमा हिरे, मिलिंद अच्युत,खंडू तिकोने,देहुरोड अध्यक्ष हाजिमंलग मारिमत्तु,विशाल वाळुंज राजीव शिंदे,पवन गायकवाड, राजेश वाघोले यांचे सह माऊली काळोखे, राजेंद्र पोळ, बाळासाहेब ढोरे,गणेश काजळे,ॲड निवृती फलके,राजीव फलके,राजू शिंदे,समीर दाभाडे आजी माजी पदाधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra : अनुदानित वसतिगृहांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी; सामाजिक न्याय विभागाची माहिती

सचिन सावंत पुढे म्हणाले, सध्या देशात लोकशाही नष्ट  करण्याचे काम होत आहे. हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. देशातील विद्वान, शेतकरी, कामगार यांचा आवाज दाबून टाकला  जात आहे. बेरोजगारी वाढत आहे. याशिवाय जाती जाती मध्ये संघर्ष निर्माण केला जात आहे.

काँग्रेस पक्षाने बळकट केलेली लोकशाही नष्ट करण्याचे काम केले जात आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संघटित होणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाची सत्ता असताना भारताचा नावलौकिक जगभर पसरला होता. मात्र भारतीय जनता पक्ष हा जगात भारताची चुकीची प्रतिमा निर्माण  करीत आहे ,असा आरोप आमदार  धंगेकर यांनी यावेळी  केला.

तर देशाला  मजबूत करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना संघर्ष  करण्यासाठी तयारी ठेवावी लागेल. सर्व सामान्यांना ताकद देण्याचे काम काँग्रेस पक्ष करु शकतो असा विश्वास  व्यक्त करुन ज्येष्ठ नेते रामदास काकडे म्हणाले की ,त्यासाठी मजबूत संघटन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी योगदान दिले पाहिजे.

तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी प्रास्ताविक केले. ॲड.खंडू तिकोने, यादवेंद्र खळदे, कैलास कदम, माऊली काळोखे,अ‍ॅड.दिलीप ढमाले, मिलिंद अच्युत आणि पदाधिकाऱ्यांनी विचार व्यक्त केले. रणजीत काकडे, गोरख काकडे, विशाल वाळूंज, योगेश

पारगे आणि सहकाऱ्यांनी नियोजन केले.

रोहिदास वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले.राजेश वाघोले यांनी आभार मानले.याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश (Talegaon Dabhade) केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.