Nigdi : सोमाटणेत प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल आणि जुनिअर कॉलेजच्या नवीन शैक्षणिक शाखेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे कमला शैक्षणिक संस्थेचे ( Nigdi ) प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल आणि ज्यूनिअर कॉलेजच्या नवीन शाळेच्या कार्यालयाचे उद्घाटन मावळ भूषण तथा माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आमदार सुनिल शेळके, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, सोमाटणे गावचे सरपंच स्वाती कांबळे, उपसंरपंच नितीन मुऱ्हे, संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक डॉ. दीपक शहा, डॉ. भूपाली शहा, डॉ. तेजस शहा, डॉ. स्वप्नील शहा, विश्वस्त सिद्धांत शहा, निखील मेहता, विशाल मुऱ्हे, गौरव शहा, अंबरचे संपादक सुरेश साखवळकर समवेत विविध क्षेत्रातील आणि सोमाटणे गावचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उ‌द्घाटक माजी आमदार कृष्णराव भेगडे म्हणाले, ” कमला शिक्षण संस्थेच्या भरभराटीत ( Nigdi ) माझ्या कारकिर्दीमध्ये मी खारीचा वाटा उचलला आहे. गुणवत्तापूर्वक शिक्षण देणारी संस्था म्हणून आज अल्पावधीतच नावारूपाला आली आहे. आज तिचे वृक्षात रूपांतर झाले. त्याचा वटवृक्ष व्हावा. वृक्षवली वाढत राहो, अशा शुभेच्छा दिल्या.

Talegaon Dabhade : सर्वसामान्यांच्या हितासाठी काँग्रेसने पक्ष संघटना बळकट करावी – सचिन सावंत

आमदार सुनिल शेळके म्हणाले “राजकारणाच्या पलीकडे जाऊन उद्याच्या पिढीला घडविले पाहीजे. मावळ तालुका सुजलाम सुफलाम झाला पाहीजे. माजी आमदार कृष्णराव भेड भेगडे यांनी शैक्षणिक व सहकार क्षेत्रात भरीव कामे केली आहेत. चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात वडगांव, तळेगांव भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वेळोवेळी त्यांनी होतकरू विद्यार्थ्यांना सहकार्य व मदत केली, हे कौतूकास्पदच आहे. शेवटी संस्था टिकली व वाढली पाहीजे, असे मत  शेळके यांनी यावेळी व्यक्त केले.

माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे म्हणाले ” येणाऱ्या पिढीला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहीजे, ही काळाची गरज आहे. सोमाटणे गाव शहर म्हणून नावारूपाल येत आहे. या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु होत आहेत. नागरिकांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. पालकांचा कल देखील आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत नाव नोंदणी करण्याकडे दिसून येत आहे. जे जे सहकार्य लागेल ते दिले जाईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रकाश ओसवाल यांनी तर, आभार विश्वस्त सिद्धांत शहा ( Nigdi ) यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.