Nigdi : शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळेत वसुबारस व दीपोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – निगडी येथील शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या (Nigdi) शाळेमध्ये गुरुवारी (दि.9) दिवाळीचे औचित्य साधत पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वसुबारस व  दीपोत्सव साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शि. प्र.मंडळी नियमक मंडळ अध्यक्ष .ॲड.एस.के जैन यांच्या हस्ते झाले.   यावेळी शि.प्र मंडळी उपाध्यक्ष गजेंद्र पवार तसेच सल्लागार शि. प्र.मं. नियामक मंडळ सुधीर काळकर, रवी रबडे प्रांत गो सेवा संयोजक, सदस्य गिरीष वायकर , मिलिंद देशपांडे बांधकाम व्यवसायिक तसेच निगडीचे नगरसेवक सुमन पवळे व उत्तम केंदळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून नंद नंदिनी परिवाराचे अजित परांजपे लाभले होते.

Nigdi : सोमाटणेत प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल आणि जुनिअर कॉलेजच्या नवीन शैक्षणिक शाखेचे उद्घाटन

प्रमुख वक्ते अजित परांजपे यांनी गाईचे  भारतीय संस्कृतीत  असणारे धार्मिक व समाज जीवनातील स्थान  तसेच आजच्या विज्ञान युगातील गाईचे महत्व विशद केले. तसेच आजच्या दिवसाचे औचित्य साधून  शि. प्र. मंडळीच्या, निगडी शाळेची फेसबुक , इंस्टाग्राम पेज व युट्युब चॅनलचा शुभारंभ करण्यात आला  या दिवशीच शाळेमध्ये पालकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच सर्व विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते शाळेच्या वास्तूमध्ये  दीपोत्सव साजरा करण्यात आला. शाळेची भव्य इमारत  दिव्यांच्या प्रकाशाने  सुशोभीत दिसत होती. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद (Nigdi) दिला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.