Talegaon Dabhade : यश मिळविण्यासाठी स्वयंशिस्त महत्वाची – सुशांत पारख

एमपीसी न्यूज – विद्यार्थीदशेत प्रेरणा महत्त्वाची असते,पण यश (Talegaon Dabhade ) मिळविण्यासाठी स्वयंशिस्त खूप महत्त्वाची ठरते.नुसती पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नाही. तर आपला कौशल्यविकास करुन स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत प्रसिध्द सनदी लेखापाल सुशांत पारख यांनी व्यक्त केले. इंद्रायणी महाविद्यायाच्या बीबीए,बीसीए विभागाच्या वतीने विद्यार्थ्यासाठी आयोजित ‘सर्टिफिकेट प्रोग्राम ऑफ बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स’ (CPBFI) या कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे,बीबीए/बीसीए विभागाच्या विभागप्रमुख प्रा.विद्या भेगडे,सर्व प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पारख म्हणाले की, मुलांनी आपल्या स्वप्नातील करिअर प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पारंपरिक ज्ञानासोबतच आत्मविश्वास, संवादकौशल्य,उद्योजकता विकास, प्रात्यक्षिक ज्ञान या चतु:सूत्रीचा वापर करून व्यावसायिक ज्ञान आत्मसात करावे. फ्रॉम लर्नर टु अर्नर असलेला हा CPBFI हा प्रोग्राम वीस राज्यातील 93 शहरांमधील 312 महाविद्यालयां मध्ये चालविला जातो याची विस्तृत रूपरेषा श्री पारख यांनी यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

Maharashtra News : ईडब्ल्यूएस मधून उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात दाखल याचिकेचा शासन सकारात्मक पाठपुरवा करणार – चंद्रकांत पाटील

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संभाजी मलघे म्हणाले की, शैक्षणिक उपक्रमांसोबतच विद्यार्थांना प्रशिक्षण आणि प्लेसमेंट महत्वाचे आहे. या सर्व सोयी सुविधा

विद्यार्थांना पुरविण्यासाठी इंद्रायणी महाविद्यालय कायम तत्पर असेल असे प्राचार्य डॉ. मलघे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बीबीए/बीसीए विभागच्या विभागप्रमुख प्रा.विद्या भेगडे यांनी केले. विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अशा विविध उपयोगी कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी उपयोग करुन घ्यावा असे प्रा.भेगडे म्हणाल्या

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. तेजस्वी श्रीनिवास यांनी केले तर सूत्रंचालन प्रा. सुजाता फडतरे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थी (Talegaon Dabhade ) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.