Talegaon Dabhade : अक्षय तृतीया निमित्त डोळसनाथ महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम 

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात (Talegaon Dabhade) अक्षय तृतीया निमित्त शनिवारी(दि.22) विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.महापूजा, होमहवन,भजन,हरिपाठ,प्रवचन आणि महाप्रसाद असे विविध कार्यक्रम झाले. या विविध कार्यक्रमांसाठी ग्रामस्थांनी स्वेच्छेने सहकार्य केले.

येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात अक्षय तृतीया निमित्ताने आयोजित चंदन उटी सोहळ्यात सकाळी महापूजा माजी उपनगराध्यक्ष,उद्योजक किशोर छबुराव भेगडे व उद्योजक किरणशेठ मोहनराव काकडे ह्याच्या हस्ते झाली.

Maharashtra News : राष्ट्रीय हेल्पलाईनद्वारे होणार ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचे निवारण

 त्यानंतर 11.00 वा चंदन उटीचा लेप उपस्थित गावक-यांच्या हस्ते  महाराजांना लावण्यात आला.त्याला रंगरूप देण्याचे काम मूर्तीकार योगेश पांडूरंग कार्लेकर व रवींद्र पोपटराव पानसरे यांनी केले.12.00 वा रूद्रयाग(होम हवन) उद्योजक विलास बबनराव काळोखे व राजेश पिराजी सरोदे यांच्या हस्ते हवन करण्यात आले.

 

 

4.00 श्री डोळसनाथ महिला भजनी मंडळाचा हरीपाठ झाला. डोळसनाथ भजनी मडळींचे भजन झाले, स्वामी समर्थ केंद्र कडोलकर कॉलनी,त.दा. यांनी भैरवाष्टक पठण केले.

त्यानंतर भागवताचार्य ह भ प यतिराज महाराज लोहोर यांनी प्रवचनात अक्षय तृतीया तिथीचे विशेष महत्व संगितले. श्रीची आरती होऊन भक्तांना महाप्रसाद देऊन सांगता झाली.कार्यक्रम श्री डोळसनाथ मंदीर ट्रस्ट व लोक सहभागातुन आयोजित करण्यात आला होता.त्यात (Talegaon Dabhade) समस्त गावकरी,गुरव परिवार व ग्राम पुरोहीत रेडे परिवार सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.