Talegaon : डंपर मधून डिझेल चोरणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पार्किंग मध्ये थांबलेल्या डंपर मधून 70 लिटर डिझेल चोरणाऱ्या (Talegaon ) दोघांना तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि अटक केली आहे. ही चोरी गुरुवारी (दि.7) पहाटे मंगळूर मावळ येथे घडली.
 या प्रकरणी गणेश पांडुरंग चौधरी (वय 36 रा मंगळूर मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी चांद परिमलदास (वय 27 पश्चिम बंगाल) व शुभमकर गौरांगदास (वय 28 रा मंगळूर,मावळ) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी पार्क केलेल्या डंपर एम एच 12 क्यू डब्ल्यू 29 49 च्या टाकीमधून 6 हजार पाचशे दहा रुपयांचे 70 लिटर डिझेल काढून घेतले होते. यावेळी ते दुचाकी वरून पळून जात असताना त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करून तळेगाव एमआयडीसी पोलीस याचा पुढील तपास करत (Talegaon )आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.