Vadgaon Maval : राष्ट्रवादी भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचा तालुकास्तरीय मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या वतीने तालुका स्तरीय भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. हा मेळावा शिरगाव – प्रतीशिर्डी येथे उत्साहात संपन्न झाला.

 

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे, उपसभापती नामदेव शेलार, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष नारायण ठाकर, दत्तात्रय पडवळ, संदिप आंद्रे, संतोष मुऱ्हे, नितीन मुऱ्हे, संभाजी राक्षे, ॲड. जगन्नाथ गोपाळे, भानुदास गोपाळे, विजय गोपाळे, दत्तात्रय वाघमारे, नथुशेठ वाघमारे, मोहन अरगडे, स्वप्निल आरगडे, विलास गोपाळे, प्रा. संतोष गोपाळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले की, शासनाच्या गोरगरिब दुर्बल घटक तसेच भटक्या विमुक्त जात जमातीसाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भटक्या विमुक्त जात जमाती सेलचे अध्यक्ष नथुशेठ वाघमारे यांनी केले. तर रामदास मदने यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डाॅ. संतोष गोपाळे यांनी केले. उद्योजक विजय गोपाळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.