Maval : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या प्रवक्ते, संघटक पदांवर नियुक्त्या

एमपीसी न्यूज – मावळ (Maval)तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाची मासिक बैठक मंडळाचे आरोग्य सेवा समितीचे अध्यक्ष ह.भ.प. राजाराम असवले यांच्या निवासस्थानी टाकवे बुद्रुक येथे नुकतीच पार पडली. य बैठकीत मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या प्रवक्तेपदी ह.भ.प. सुनिल महाराज वरघडे तर संघटकपदी ह.भ.प. गोपिचंद महाराज कचरे यांची नियुक्ती झाली आहे.
आषाढी वारीनिमित्त वारकरी बांधवांना मंडळाच्या वतीने दरवर्षी आरोग्य सेवा, औषधोपचार व रूग्णवाहिकेची सेवा आदि सेवा विनामूल्य पुरवल्या जातात. त्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
यावेळी मंडळाचे संघटन संपूर्ण मावळ तालुक्यात अधिक बळकट व्हावे आणि मंडळाचे कार्य घराघरात पोहोचावे यासाठी आषाढी वारीच्या पूर्वसंधेला काही नियुक्त्या करण्यात आल्या. मंडळाच्या प्रवक्तेपदी मावळ (Maval) तालुक्यातील सुप्रसिद्ध गोसेवक, प्रवचनकार  ह.भ.प. सुनिल महाराज वरघडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मंडळाच्या संघटकपदी युवा प्रवचनकार, तरूणांचे मार्गदर्शक, ह.भ.प. प्रा. गोपिचंद महाराज कचरे यांची नियुक्ती एकमताने करण्यात आली. या दोन्ही मान्यवरांचा सन्मान यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे, कार्याध्यक्ष ह.भ.प. संतोष कुंभार, सचिव रामदास पडवळ, ह.भ.प. राजाराम असवले यांच्या हस्ते करण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष,कार्याध्यक्ष व सचिव यांनी यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देवून अभिनंदन केले. ह.भ.प. गोपिचंद महाराज कचरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मंडळाने आजवर राबविलेल्या अनेक उपक्रमांचे कौतुक केले व मंडळाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.
या बैठकीसाठी मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप वावरे,जेष्ठ वारकरी ह.भ.प. महादुबुवा नवघणे,आरोग्यदूत ह.भ.प. योगेश गवळी, सहसचिव नितीन आडिवळे,आंदर मावळ विभागीय अध्यक्ष दिपक रावजी वारिंगे, कायदेशीर सल्लागार सागर एकनाथ शेटे, विभाग प्रमुख सुखदेव गवारी यांसह अनेक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.