House Burglary: घरफोडी करून हैद्राबादला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – गंजपेठ येथे घरफोडी करून हैद्राबादला पळून जाण्याच्या तयारीत आसलेल्या आरोपीला खडक पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. आरोपीने शनिवारी (दि.8) रात्री घरफोडी करून अडीच लाखांचा ऐवज चोरला होता. मोहम्मद तमीम कलीमुद्दीन चौधरी (वय 18 रा.लोहीयानगर , पुणे, मुळ-रंगारेड्डी, हैद्राबाद) असे अटक आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानासाठी गोळा केलेला ऐवज आरोपीने घराची कडी उघडून चोरून नेल्याची (House Burglary) फिर्याद खडक पोलीस ठाण्यात फिर्यादीने दिली होती.त्यानुसार पोलीस तपास करत असताना पोलीस अंमलदार संदिप तळेकर व विशाल जाधव यांना खबर मिळाली की, मोहम्मद चौधरी रविवारी (दि.9) हा लोहियानगर येथे आला असून तो पळून जाण्याच्या तयारीत आहे.

NIMA : निमाच्या अध्यक्षपदी डॉ प्रताप सोमवंशी

पोलिसांनी तातडीने सापळा रचून आरोपीला अटक केले.त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले.त्याच्याकडून पोलिसांनी  घरफोडीतील 2 लाख रुपये रोख व 10 ग्रॅम वजनाचे दागिने असा एकूण 2 लाख 50 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपीवर खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई खडक पोलीस ठाण्याचे (Khadak Police Station) वरीष्ठ पोलीस निरीक्ष संगिता यादव,पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश तटकरे, सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव,पोलीस उपनिरीक्षक अतुल बनकर, पोलीस अमंलदार अजीज बेग, संदिप तळेकर, विशाल जाधव,सागर घाडगे, लखन ढावरे, राहूल शिंगे, मंगेश गायकवाड, रफिक नदाफ, अक्षयकुमार वाबळे,नितीन जाधव,महेश पवार,महेश जाधव, समीर शेख यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.