Chakan : बायकोला मारहाण करताना सोडवले  म्हणून सासर्‍याला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – बायकोला मारत असताना सासर्‍याने भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी केली म्हणून जावयाने थेट सासऱ्यालाच लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना शनिवारी ( दि.24) चाकण (Chakan) हद्दीतील खडूस गावात घडली.

Chakan : बायकोला मारहाण करताना सोडवले  म्हणून सासर्‍याला बेदम मारहाण

याप्रकरणी रंगनाथ केशव तयार (वय 55 राहणार काळुस ता खेड) यांनी चाकण (Chakan) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जावई समीर मुरलीधर गाडेकर (वय 42 राहणार राजगुरुनगर) व त्याचा मित्र अनिल बबन ढेरे (वय 41) यांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हा फिर्यादीचा जावई असून त्याने फिर्यादीच्या मुलीला तिच्या माहेरी आणात  मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी हे भांडणे सोडवण्यासाठी गेले. याचा राग येऊन आरोपीने त्याच्या मित्राला बोलावले व दोघांनी लाकडी दांडके व हातात कोयता घेऊन दहशत पसरवली .

 

तसेच फिर्यादी यांचे हात पकडून त्यांच्या खांद्यावर व डोक्यावर लाकडी दांडक्याने मारून त्यांना गंभीर जखमी केले. चाकण (Chakan) पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.