Maval : ज्येष्ठ नागरिकाला तरुणाकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून तरुणाने 65 वर्षीय नागरिकाला काठीने बेदम मारहाण केली आहे हा प्रकार शनिवारी (दि.24) रात्री मावळ (Maval) येथील माळवाडी परिसरात घडला.

Pimpri : नितीन गडकरी येत्या गुरुवारी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर

याप्रकरणी चांगदेव तुकाराम लावरे (वय 65 राहणार माळवाडी मावळ (Maval) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली असून सागर संपत भोजने (वय 23 राहणार माळवडी) याच्याविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या घरावर दगड पडले असता फिर्यादी घराबाहेर आले यावेळी आरोपीने काही कारण नसताना काठीने व हाताने फिर्यादी यांना बेदम मारहाण केली, त्यामध्ये फिर्यादी यांचा हात फ्रॅक्चर झाला तसेच आरोपीने फिर्यादी यांच्या आईला व आजीला हाताने मारहाण केली यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.