Thergaon : महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात मॉक ड्रिल

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे (Thergaon)औचित्य साधून सरकारी कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात मॉक ड्रिल घेण्यात आले.

आपत्कालीन घटना घडल्यास त्या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरे जावे याची चाचपणी घेण्यासाठी मॉकड्रिल घेणे आवश्‍यक असते. त्यादृष्टीने थेरगाव रुग्णालयात गुरुवारी मॉकड्रिल घेण्यात आले. थेरगाव रुग्णालय प्रमुख व मॉकड्रिलचे इन्सीडन्ट कमांडर डॉ. अभय दादेवार यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी रुग्णालयात झालेल्या मॉक ड्रिल मध्ये चौथ्या मजल्यावर दहा डमी रुग्ण ठेवण्यात आले होते.

Pimpri News : शाळांसमोर असणारे धोकादायक होर्डिंग तातडीने काढा; सोसायटी फेडरेशनची मागणी

चौथ्या मजल्यावर आग लागून धूर पसरताच अलार्म वाजला. तत्पूर्वी सर्व वार्डमधील रुग्ण व नातेवाईकांना हा डेमो असल्याच्या सूचना देण्यात आली होती.

पिंपरी आणि थेरगाव अग्निशामक केंद्राचे 16 जवान या मोहिमेत सहभागी झाले होते. यासह फ्लोअर मार्शल, वार्डन अन्य दहा ग्रुप नेेमुन त्यांना विविध जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या होत्या. डमी रुग्णांना इतर वार्डमध्ये व चौघांना वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. प्रत्यक्षात रुग्णालयात खरीखुरी आगीची घटना घडल्यास त्यास कसे सामोरे जावे, काय-काय खबरदारी घ्यावी. कोणी काय जबाबदारी पार पाडावी याची रंगीत तालीम  मॉकड्रिलद्वारे घेण्यात (Thergaon)आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.