Maval : कॅंटोंमेंट हद्दीतील अवैध होर्डिंग्जची तपासणी करा-विशाल दांगट पाटील

एमपीसी न्यूज- देहूरोड कॅंटोंमेंट बोर्ड हद्दीत असलेल्या सर्व होर्डिंग्जची (Maval ) तपासणी करुन बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी युवा सेना ( ठाकरे गट) मावळ उप तालुकाधिकारी विशाल दांगट पाटील यांनी देहूरोड कॅंटोंमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने यांच्याकडे केली आहे.

किवळे येथील मुकाई चौकात नुकत्याच झालेल्या वादळी पावसात भलेमोठे अवैध होर्डिंग्ज कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या घटनेने पिंपरी चिंचवड शहरासह परिसरातील अवैध होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पाश्वर्भूमीवर देहूरोड कॅंटोंमेंट बोर्ड हद्दीतील अवैध होर्डिंग्जची तपासणी तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी युवा सेनेचे मावळ तालुका उपअधिकारी विशाल दांगट पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

त्याचबरोबर अवैध होर्डिंग्जमुळे कॅंटोंमेंट बोर्डाचे उत्पन्न बुडत असल्याकडेही निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. अवैध होर्डिंग्जवर दंडात्मक कारवाई केल्यास कॅंटोंमेंट बोर्डाच्या महसुलात वाढ होऊन अवैध होर्डिंग्ज उभारणीला चाप बसण्यास मदत होईल, असा विश्वास दांगट यांनी निवेदनात व्यक्त केला आहे. दरम्यान, युवा सेनेच्या मागणीनंतर आता कॅंटोंमेंट बोर्ड प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माने यांच्या वतीने बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत यांनी निवेदन (Maval  ) स्वीकारले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.