Wakad : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून  विनयभंग करणाऱ्या तरुणास अटक

एमपीसी न्यूज –  अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून (Wakad) तिच्याशी गैरवर्तन केल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना काळेवाडी येथे घडली.

प्रिन्सकुमार विजय ठाकूर (वय 21, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत 14 वर्षीय मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maval : कॅंटोंमेंट हद्दीतील अवैध होर्डिंग्जची तपासणी करा-विशाल दांगट पाटील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीचा पाठलाग करून तिला भेटायला बोलावले. त्यासाठी मुलीने नकार दिला असता तिचे फोटो व्हायरल करण्याची आरोपीने धमकी दिली. तसेच मुलीचा तिच्या घरात आणि शौचालयात पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास (Wakad) करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.