MPC News Special : रस्त्यात थांबून प्रवासी भरणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाई

एमपीसी न्यूज – रस्त्यात रिक्षा थांबवून प्रवासी रिक्षात भरणाऱ्या (MPC News Special) रिक्षा चालकांवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी गुरुवारी (दि. 20) कठोर कारवाई केली. पिंपरी वाहतूक विभागाने बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई केली. मात्र अन्य वाहतूक विभागात रिक्षा चालक बेफिकीरपणे नियमभंग करतात. पिंपरी वाहतूक पोलिसांप्रमाणेच अन्य वाहतूक विभागात देखील कारवाई व्हायला हवी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा शहरातील मुख्य चौक आहे. या चौकातून जुना पुणे-मुंबई महामार्ग जातो. इथे महापालिका मुख्यालय आणि विविध कार्यालये असल्याने चौकात सातत्याने नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यामुळे इथल्या वाहतुकीवर देखील कायम ताण असतो. चौकातून पिंपरीगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सलग तीन मद्याची दुकाने आहेत. दुकानांच्या बाहेर चकणाविक्रीच्या हातगाड्या लागलेल्या असतात. या हातगाड्यांच्या आजूबाजूला काही मद्यपी थांबलेले असतात.

Wakad : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून  विनयभंग करणाऱ्या तरुणास अटक

इथेच पीएमपी बस थांबा आहे. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहत चकणा विक्रीच्या हातगाडीजवळ नाईलाजाने थांबावे लागते. याच बस थांब्याजवळ रिक्षा थांबतात. हे रिक्षा चालक रत्यावर रिक्षा उभा करून प्रवासी भारतात. पदपथाच्या पुढे चकणा विक्रीच्या हातगाड्या आणि त्याच्या पुढे रिक्षा थांबल्याने रस्ता अतिशय अरुंद होतो. याच कारणामुळे या भागात सतत वाहतूक कोंडी होते.

याचा पादचारी नागरिक, वृद्ध, महिलांना नाहक त्रास होतो. भर रस्त्यातून वाट काढत पादचारी नागरिकांना जावे लागते. हा प्रकार निदर्शनास आल्याने पिंपरी वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पिंपरी वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांवर आर्थिक दंडाची कारवाई केली.

याच परिसरात रिक्षा थांबवून रिक्षात मद्यपान होत असल्याचेही प्रकार मागील काळात समोर आले होते. यावर देखील पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून अशा प्रकारे कोणी मद्यपान करत असतील तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाणार आहे. रिक्षा चालक व इतर सर्व वाहन चालकांनी इतरांना त्रास होईल अशा प्रकारे वाहने चालवू नयेत, अन्यथा कारवाई केली जाणार (MPC News Special) असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.