Pimpri : शहरातून धावणाऱ्या खासगी बसची वाहतूक पोलिसांकडून तपासणी सुरु

एमपीसी न्यूज – समृद्धी महामार्गावर झालेल्या (Pimpri) भीषण बस अपघातात 26 निष्पाप जीवांचा बळी गेला. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातून बाहेर पडणाऱ्या बसेसची तपासणी करण्यास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरुवात केली आहे. बसचा फिटनेस आणि चालकाची स्थिती आदींची तपासणी केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून दररोज 156 खासगी प्रवासी बस धावतात.

पिंपरी-चिंचवड शहराची कामगारनगरी, उद्योगनगरी अशी ओळख आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव, आळंदी- मरकळ, आणि हिंजवडी हा औद्योगिक परिसर येतो. हिंजवडी, तळवडे परिसरात आयटी क्षेत्राशी संबंधित कंपन्या आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे 1400 मोठ्या कंपन्या सुरु आहेत. या कंपन्यांमध्ये कामाच्या निमित्ताने लाखो कामगार राज्य आणि देशभरातून आले आहेत.

अनेक कामगार कामासाठी शहरात येऊन शहरात स्थायिक झाले आहेत. दिवाळी, उन्हाळा, गणपती, होळी अशा सण उत्सवांच्या निमित्ताने कामगार त्यांच्या कुटुंबासह गावी जातात. अनेकजण खासगी बसने गावी जाण्यास पसंती देतात. त्यात रात्रीचा प्रवास असेल तर स्लीपर कोचने प्रवास केला जातो. यामुळे शहरातून धावणाऱ्या स्लीपर कोच बसच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

चालकासह बसची तपासणी गरजेची – (Pimpri)

प्रवास सुरु करण्यापूर्वी प्रवाशांनी चालकाशी संवाद साधावा. चालकाची मानसिक स्थिती त्यातून समजते. चालकाने मद्यपान केले असेल तर त्याला बस चालविण्यापासून रोखता येते. प्रवासी बसचे फिटनेस सर्टिफिकेट प्रवाशांनी शक्य झाले तर पहायला हवे. कारण चालकासह बसचा फिटनेस असणे देखील तितकेच गरजेचे आहे.

वाहतूक पोलिसांकडून तपासणीला सुरुवात –

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस पिंपरी चिंचवड शहरातून धावणाऱ्या स्लीपर कोचसह सर्व आरामदायी बसचा आढावा घेणार आहेत. यामध्ये सर्व बसचे फिटनेस सर्टिफिकेट सह अन्य कागदपत्र तपासण्यात येणार आहेत तसेच रात्रीच्या वेळी शहरातून बाहेर पडणाऱ्या स्लीपर कोच वरील चालकांची ब्रेथ ऍनालायझरने अचानक तपासणी केली जाणार आहे. यामध्ये निष्काळजीपणा आढळून आल्यास चालकांसह मालकांवरही थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

RTO News : पिंपरी चिंचवड आरटीओ कडून 146 खासगी बसेसवर कारवाई

खाजगी बसची संख्या –

सांगवी – 16
हिंजवडी – 4
निगडी – 35
चिंचवड – 11
भोसरी – 22
चाकण – 13
वाकड – 55

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.