Today’s Horoscope 05 July 2023 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य –

एमपीसी न्यूज :  आजचे पंचांग – Today’s Horoscope

वार – बुधवार.

05 .07.2023 .

शुभाशुभ विचार- 8 नंतर चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – श्रवण.

चंद्र राशी –  मकर.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- चंदेरी )

आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे करू शकाल. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील. आज विरोधकांनाही तुमचे विचार तुम्ही पटवून देऊ शकाल.

 

वृषभ (शुभ रंग- क्रीम)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नैराश्य येईल. परंतु हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. स्वतःवर संयम ठेवा. ज्येष्ठांना उपासनेची प्रचिती येईल.

 

मिथुन ( शुभ रंग- सोनेरी)

आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असून मोठे आर्थिक व्यवहार असतील तर ते उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनःशांती मिळू शकेल. आज कोणतेही धाडस नको.

 

कर्क (शुभ रंग- मोतिया)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. संध्याकाळी जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

 

सिंह (शुभ रंग- लाल )

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज तब्येत थोडी नरमच असेल. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर मिटतील.

 

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची ही उत्तम साथ असेल.  कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. कलाक्षेत्रातील नवोदितांच्या कष्टांचे चीज होईल.

 

तूळ ( शुभ रंग- पांढरा)

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहाल. स्थावराचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहावे.

 

वृश्चिक (शुभ रंग- मरून)

ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. अति आत्मविश्वासही नुकसानास कारणीभूत होऊ शकतो. आज काही अति हुशार मंडळी भेटतील, आज कमीच बोला.

 

धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट प्रश्न सोपे होतील. पाहुण्यांची उठबस गृहिणी आनंदाने करतील.

 

मकर ( शुभ रंग- राखाडी)

आज कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दाला मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत डोकावाल. प्रवासात काही काळ खोळंबा होईल.

 

कुंभ (शुभ रंग – निळा )

आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. एकाच्या भरोशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. आज फक्त आपल्या स्वार्थाकडे लक्ष द्या परमार्थ अजिबात परवडणार नाही.

 

मीन -(शुभ रंग – गुलाबी)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज नमते घेतील. संततीकडून काही महत्त्वाच्या बातम्या येतील.

 

शुभम भवतु

 

 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क *9689165424*

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.