Today’s Horoscope 03 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 03 February 2024
आजचा दिवस – शुक्रवार.
तारीख – 03.20.2024
शुभाशुभ विचार – विशाखा वर्ज्य.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – विशाखा.
चंद्र राशी – तुळ 25.04 पर्यंत नंतर वृश्चिक.
—————————–
मेष – ( शुभ रंग – निळा)
नवीन नोकरीच्या शोधात असाल तर योग्य संधी चालून येतील. महत्त्वाच्या चर्चा सकारात्मकतेने पार पडतील. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील. उत्साही दिवस.

वृषभ ( शुभ रंग- आकाशी)
नोकरीत जास्त वेळ थांबून कामे पूर्ण करावी लागतील. काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. उधारी उसनवारी टाळावी.

मिथुन – ( शुभ रंग- लाल)
आज तुम्ही चैन, करमणूक या गोष्टींना प्राधान्य द्याल. नवोदित कलाकारांना प्रसिद्धी मिळेल. गृहिणी आपले छंद जोपासण्यासाठी वेळ काढतील. मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल.

कर्क – ( शुभ रंग – पांढरा)
आज कुठेच न जाता घरीच विश्रांतीचा तुमचा मूड असेल. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीने तुम्ही समाधानी असाल. वास्तु व वाहन खरेदीच्या कामाना गती येईल.

सिंह -( शुभ रंग – मोरपंखी)
महत्त्वाचे निर्णय घेताना आज तुमची द्विधा मनस्थिती होईल. महत्त्वाच्या कामासाठी झालेले प्रवास कार्य साधक ठरतील. गृहिणींचा आज गप्पांमध्ये जास्त वेळ जाईल.

कन्या – ( शुभ रंग- जांभळा)
आज व्यापारी वर्गासाठी उत्तम दिवस. दुकानदारांची उधारी वसूल होईल. खर्च कितीही वाढला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. वाणीत मात्र गोडवा असू द्या.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमचा अहंकार वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत असाल तर साहेबांशी नमते घ्या व सहकार्यांशी जुळवून घ्या. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणणेच हिताचे राहील.

वृश्चिक ( शुभरंग – सोनेरी)
आज तुमचा बराच वेळ घराबाहेर जाईल. बेरोजगारांनी नोकरीसाठी घरापासून लांब जाण्याची तयारी ठेवावी. काही जणांना आज तातडीचे प्रवास घडतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. (Today’s Horoscope 03 February 2024)

धनु (शुभ रंग- केशरी)
कार्यक्षेत्रातील तुमच्या समर्पणाचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. आज झालेले काही अनपेक्षित लाभ तुमचा उत्साह वाढवतील.

मकर (शुभ रंग- चंदेरी)
एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी अधिकारांचा गैरवापर टाळावा. आज फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्यावे.

कुंभ – (शुभ रंग- गुलाबी)
उद्याग व्यवसायात आलेल्या काही अडचणींना आज तुम्ही यशस्वीपणे तोंड द्याल. अनुभवी व्यक्तींचे सले मात्र जरूर घ्यावेत. आज कायद्यात राहाल तरच फायद्यात रहाल.

मीन ( शुभ रंग- मोतिया)
कामगार वर्गाने आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. आज कोणतीही धाडसाची कामे टाळा. मोठ्या रकमेची ने आण करताना सतर्क रहा. वाहन चालवताना जपून.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.