Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात 15 लाख मतदार, 36 हजार मतदार वाढले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात लाेकसंख्या (Pimpri) वाढत असून मतदारांची संख्याही वाढत आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीन विधानसभा मतदार ताथवडे भाग असे एकुण 15 लाख 20 हजार 880 मतदार आहेत. चिंचवड मतदार संघ राज्यातील दुस-या क्रमाकांचा सर्वात मोठा मतदार संघ आहे. एकूण 36 हजार 622 मतदार वाढले आहेत. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांना येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करता देणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 23 जानेवारीला महाराष्ट्र राज्यातील विधानसभानिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली आहेत. पिंपरी मतदार संघात 3 लाख 64 हजार 806 मतदार आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 5 लाख 95 हजार 408 मतदार आहेत तर भोसरी विधानमा मतदार 5 लाख 35 हजार 666 आहेत. शहरात एकूण 8 लाख 2 हजार 160 पुरुष, 6 लाख 93 हजार 559 महिला आणि 161 तृतीयपंथी मतदार आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या एक लाख 9 हजारांनी कमी आहे. या मतदार यादीतून दुबार नावे, मयताचे नावे समान छायाचित्र अमलेली नावे, स्थलांतरीत मतदार यांची नावे वगळण्यात आली आहेत.

घराेघरी केलेली जनजागृती, हाऊसिंग सोसायट्या महाविद्यालयात विशेष मोहिमा घेण्यात आल्या, त्यामुळे यंदा 18 ते 20 या वयोगटातील नवमतदारांची संख्या वाढली आहे. चिंचवड मतदार संघात 5 हजार 63 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. एकूण 21 हजार 716 जणांनी नोंदणी झाली आहे. भोसरी मतदार संघात 8 हजार 808 मतदारांची संख्या वाढली आहे. त्यात 2 हजार 519 हे 18 ते 19 वयोगटातील नवमतदार आहेत. पिंपरी मतदार संघात एकूण 6 हजार मतदार वाढले आहेत.

15 लाखांपेक्षा अधिक मतदार

पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघाची एकूण मतदार (Pimpri) संख्या 14 लाख 95 हजार 880 इतकी आहे. भोर विधानसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे गावाचा भाग समावेश आहे. तेथे सुमारे 25 हजार मतदार संख्या आहे, ती मतदार संख्या धरल्यास पिंपरी-चिंचवड शहराची एकूण मतदार संख्या 15 लाख 20 हजार 880 इतकी होते.

चिंचवडमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र

चिंचवड विधानसभा मतदार संघ हा राज्यातील सर्वांत मोठा दुसऱ्या क्रमाकांचा मतदार संघ आहे. या मतदार संघात पुणे जिल्ह्यातील 21 मतदार संघात सर्वांधिक 5 लाख 95 हजार 408 मतदार तर, 510 मतदान केंद्र आहेत. भोसरी मतदार संघात एकूण 464 मतदार केंद्र तर पिंपरी मतदार संघात 399 केंद्र आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.