Pimpri : शहरातील मराठा समाजाचे 100 टक्के सर्वेक्षण पूर्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri) सुमारे सहा लाख घरांना भेटी देऊन मराठा समाजाचे सर्वेक्षण शुक्रवार अखेर रात्री वाजेपर्यंत मुदतीमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. शेवटच्या तीन दिवसात 10 ते 11 टक्के सर्वेक्षण केल्यामुळे मुदतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती सहायक आयुक्त तथा सहायक नाेडल अधिकारी अविनाश शिंदे यांनी दिली.

मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या समाजाचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी शहरात (दि. 23) जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले हाेते. या सर्वेक्षणासाठी महापालिकेने 2 हजार 143 अधिकारी, कर्मचारी नेमले हाेते. सर्वेक्षणाची पहिली मुदत (दि.31) जानेवारीला संपली हाेती. मात्र, सर्वेक्षण बाकी असल्याने राज्य मागासवर्गीय आयाेगाने दाेन दिवसांची मुदत वाढवून दिली हाेती. शुक्रवार सायंकाळअखेर शहरातील 6 लाख घरांना भेटी देऊन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात 15 लाख मतदार, 36 हजार मतदार वाढले

ऑनलाइऩ मोबाईल अॅपवर जमा झालेल्या नोंदींचा डाटा थेट मागासवर्गीय आयोगाच्या सर्व्हरवर जमा करण्यात आला आहे. सुरूवातीला या अॅपमध्ये (Pimpri) अडचणी आल्या. तर काही भागांमध्ये जात विचारल्यामुळे सर्वेक्षणास विरोध झाल्याच्याही घटना घडल्याचे समाेर आले हाेते. मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक, सुपर वायझर, नाेडल अधिकारी, लिपिक असे 2 हजार 143 अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले हाेते. शहरातील 6 लाख घरांना भेटी देऊन दिलेल्या मुदतीमध्ये 100 टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
– अविनाश शिंदे, सहायक नाेडल अधिकारी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.