Pune : पुणे विद्यापीठात रामायणावरून महाभारत; चुकीचे दृश्य दाखवल्यामुळे विद्यार्थ्यांना मारहाण

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Pune) रामायणावर आधारित सादर करण्यात आलेल्या नाट्यावरून वादांग निर्माण होऊन दोन विद्यार्थ्यांच्या गटात हाणामारी झाली. नाटकात चुकीचे रामायण दाखवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी  भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे. 

Pune : पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये गुडघे प्रत्यारोपणात सिरॅमिक इम्प्लांटचा वापर

अधिक माहिती अशी, की ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी (दि. 2 फेब्रुवारी) संध्याकाळी रामायणात (Pune) काम करणार्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. जब वी मेट या नावाच्या या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न आला होता. ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्र नावच्या विद्यार्थ्याने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. मात्र या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला. यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोलीस तैनात करण्यात आलेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.