Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या अध्यक्ष पदी सुरेश शेंडे तर सेक्रेटरीपदी भगवान शिंदे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचा आठवा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. अध्यक्षपदी सुरेश शेंडे यांनी मावळते अध्यक्ष दीपक फल्ले यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर सेक्रेटरीपदी भगवान शिंदे यांची निवड झाली.

Pune Rain : पुण्यात 26 टक्क्यांहून कमी पावसाची नोंद; पेरणीसाठी शेतकऱ्यांची नाराजी

आरोग्य शिबिरे, पर्यावरण, पिंकेथॉन, सायक्लोन, सामुदायिक विवाह इत्यादी सह नवनवीन उपक्रम राबविण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी पदग्रहण समारंभात व्यक्त केला

 

तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचा आठवा पदग्रहण सोहळा अतिशय थाटामाटात संपन्न झाला सन 2023-24 या रोटरी वर्षासाठी अध्यक्ष सुरेश शेंडे उपाध्यक्ष किरण ओसवाल तर सेक्रेटरी म्हणून माजी मुख्याध्यापक भगवान शिंदे यांनी पदभार स्वीकारला.

 

या सर्वांग सुंदर पदग्रहण सोहळ्यास मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके,पीडीजी विलास जगताप, डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर नितीन ढमाले, संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे,मावळते अध्यक्ष दीपक फल्ले, एजी शंकर हदीमणी इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 

विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी  करणारा रोटरी सिटी क्लब मावळ पंचक्रोशीत नावलौकिक मिळवलेला क्लब आहे आरोग्य,शिक्षण, पर्यावरण,सामाजिक इ.उपक्रमांसाठी  आपण भरीव मदत करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केले.

 

आंतरराष्ट्रीय  स्तरावरील रोटरीचे कार्य,रोटरी सभासदांची कर्तव्य व जबाबदारी महत्त्वाचे प्रकल्प कसे राबवावेत याचे मार्गदर्शन पीडीजी विलास जगताप यांनी विशद केले.

 

क्लबच्या यशाचे गमक सभासदांच्या विविध प्रकल्पात असते हे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर नितीन ढमाले यांनी विशद केले. रो.मावळते अध्यक्ष दिपक फल्ले, संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे,हरिश्चंद्र गडसिंग यांनी मनोगते व्यक्त केली. प्रकल्प प्रमुख संतोष शेळके यांनी अध्यक्ष व सेक्रेटरी यांचा परिचय करून दिला.

 

सदर समारंभ प्रसंगी रामनाथ कलावडे, संगीता शिरसाट, वैशाली जुन्नरकर, नवनाथ म्हसे, नितीन शहा, रमेश मराठे, रितेश फाकटकर, राकेश गरुड, संतोष मोईकर,शंतनू निंबाळकर, मनोज कुमार नायडू, कार्तिकी बानगुडे,वर्षा खरगे इत्यादी तेरा नवीन सभासदांनी रोटरी सिटी क्लब मध्ये पदार्पण केले.

 

आरोग्य शिबिरे,पर्यावरण,पिंकेथॉन, सायक्लोन,सामुदायिक विवाह इत्यादी सह नवनवीन उपक्रम राबविण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी व्यक्त केला. समारंभात सुरेश शेंडे यांनी 2023 -24 च्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची घोषणा केली. रो दिलीप पारेख, रो विलास काळोखे, रो संजय मेहता, रो  संतोष शेळके, रो.दिपक फल्ले,रो.अविनाश नांगरे यांची डिस्ट्रिक्ट 3131 ला विविधपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सेक्रेटरी भगवान शिंदे निर्मित क्लब रोस्टर व हर्षल पंडित लिखीत प्रथम बुलेटीन यांचे समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले.

 

नवनिर्वाचित सेक्रेटरी भगवान शिंदे यांनी सेक्रेटरी अनौंसमेंट केली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मिलिंद निकम यांनी केले तर आभारप्रदर्शन उपाध्यक्ष किरण ओसवाल यांनी केले.

 

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संतोष‌ परदेशी, सुरेश धोत्रे, संजय वाघमारे, सुनिल महाजन, प्रशांत ताये, प्रसाद पाटील,मनोज ढमाले, राजेश गाडे पाटील, धनश्री काळे,शरयू देवळे, राकेश ओसवाल, विनोद राठोड, मनोज राठोड,प्रदीप मुंगसे, प्रसाद बानगुडे,निखिल महापात्रा,संजय चव्हाण, राजेंद्र कडलग, सुरेश दाभाडे, तानाजी मराठे, बाळासाहेब रिकामे, डॉ रघुनाथ कश्यप, सुनंदा वाघमारे, प्रदीप टेकवडे, आनंद पुर्णपात्रे, संतोष सातकर, विश्वास कदम, सुर्यकांत म्हाळसकर,वैभव पाचपोर,डॉ सौरभ मेहता इ.नी विशेष परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.