Talegaon dabhade : प्रत्येक शेतकऱ्याने देशी गोधनाचे संरक्षण, संवर्धन करणे काळाची गरज

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक विलास काळोखे यांचे मत

एमपीसी न्यूज – प्रत्येक शेतकऱ्याने देशी गोधनाचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. देशी गोधनाच्या गोमूत्र आणि शेण खतावर सेंद्रिय शेती केली जाते. सेंद्रिय शेतीत पिकणारे अन्नधान्य सकस आहे, असे मत रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक विलास काळोखे यांनी व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या गोशाळेत गायींच्या लसीकरणाच्या संदर्भात  शनिवारी (दि.8)  ते बोलत होते.

काळोखे पुढे म्हणाले ज्या गरीब गरजू शेतकऱ्यांना देशी गायीचे पालन करायचे आहे त्यांना मोफत गायीचे वाटप करत आहे.

गोशाळेत आल्यावर प्रत्येक गायींना त्यांचे नावाने आवाज दिल्यावर गायी जवळ येतात. तो आनंद खूपच वेगळा असतो. देवणी, लालकंदारी व काँग्रेस या तीन जातीच्या गायीचे पालन केले आहे. गायींना पोषक आहार तसेच पाणी पिण्यासाठी सेन्सर भांडे बसविले आहे. अनेक शेतकरी गोशाळेला भेट देतात.

याप्रसंगी  उद्योजक मयुर काळोखे, श्रीकांत वायकर, अतुल वायकर तसेच  रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.