Alandi : गॅस सिलेंडरच्या स्फोटात हॉटेल व कॅफेचे साहित्य जळून खाक

एमपीसी न्यूज : आळंदी देहूफाटा येथील एमआयटी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल आणि कॅफेला गॅस सिलेंडर स्फोटामुळे दि.5 रोजी आज पहाटे सव्वाचारच्या सुमारास आग लागली होती.

Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या अध्यक्ष पदी सुरेश शेंडे तर सेक्रेटरीपदी भगवान शिंदे

आगीचे स्वरूप पाहता आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल व पिंपरी चिंचवड महानगरपालिका मोशी केंद्र या दोन अग्निशमन दलास आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. .तत्काळ दोन्ही दल घटनास्थळी पोहचले.

 

अग्निशमन वाहनांद्वारे आळंदी नगरपरिषद अग्निशमन विभाग कर्मचारी प्रसाद बोराटे, विनायक सोळंकी, तुळशीराम कोळपे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका मोशी केंद्र अग्निशमन विभाग कर्मचारी लक्ष्मण होळे,सुयोग जगताप, मंगेश साळुंखे,शुभम कानडे,महेश गरड या कर्मचाऱ्यांनी तेथील आगीवर नियंत्रण मिळवले.

 

गॅस सिलेंडर  स्फोटमुळे हॉटेल अणि कॅफेमधील साहित्य पूर्ण जळून खाक झाले आहे. या घटने मध्ये  कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्यापपर्यँत कळू शकले नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.