Today’s Horoscope 27 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग (Today’s Horoscope 27 January 2024)
आजचा दिवस – शनिवार.
तारीख – 27.01.2024
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – आश्लेषा 13.01 पर्यंत नंतर मघा.
चंद्र राशी – कर्क 13.01 पर्यंत नंतर सिंह.
—————————–
मेष – ( शुभ रंग – डाळिंबी)
घरगुती लघुउद्योग तेजीत चालतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. जेष्ठांना आज प्रकृती उत्तम साथ देईल.

वृषभ ( शुभ रंग- राखाडी)
वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळलेत तर बरे होईल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील. रिकामटेकड्या गप्पांमध्ये आज बराच वेळ वाया जाईल.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)
खिशात पैसा खेळता राहील. कमी कष्टात जास्त लाभ आज पदरात पडू शकतो. दुरावलेली काही नाती असतील तर जवळ येतील. आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल.

कर्क – ( शुभ रंग – भगवा)Today’s Horoscope 27 January 2024
आज आपल्याच मनाप्रमाणे वागाल थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलण्याने नाती दुरावण्याची शक्यता आहे. कोणी मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका.

सिंह -( शुभ रंग – पांढरा)
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दाला मान द्यावा लागेल. आज प्रवासात खाण्यापिण्यावर ताबा ठेवा. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

कन्या – ( शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज तुम्ही चैनीच्या वस्तूंची खरेदी ही कराल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

Maval : पवना धरणात बुडून मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

तूळ ( शुभ रंग- डाळिंबी)
आज आळस झटकून कामाला लागल. व्यवसायातील वाढत्या स्पर्धेला यशस्वीपणे तोंड द्याल. भावनेच्या घरात कोणालाही शब्द देऊन अडकू नका. मित्रांच्याही आज फार नादी लागू नका.

वृश्चिक ( शुभरंग – लाल)
कार्यक्षेत्रात ध्येय प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

धनु (शुभ रंग- भगवा)
आज मोठे आर्थिक व्यवहार सावधपणे करा. नाका समोर चाला. गैरवर्तनाने प्रतिष्ठेची हानी संभवते. आज संध्याकाळी फक्त सत्संगाकडे पावले वळवणेच हिताचे राहील.

मकर (शुभ रंग- मरून)
केवळ मोठेपणा घेण्यासाठी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील.

कुंभ – (शुभ रंग- केशरी)
आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. येणी असतील तर वसूल होतील.

मीन ( शुभ रंग- गुलाबी)
आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील. प्रिय व्यक्तीस आज एखादी भेटवस्तू द्याल.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.