Akurdi : ऐश्वर्यम कम्फर्ट सोसायटी आकुर्डीमध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : ऐश्वर्यम कम्फर्ट सोसायटी (Akurdi) या खंडोबा मंदिर जवळ आकुर्डी येथील सोसायटीमध्ये दि. 26 जानेवारी रोजी 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.

आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक देवाराम वारे व रामकृष्ण डे उपस्थित होते. उपस्थित मान्यवारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Today’s Horoscope 27 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजच्या दिनाचे औचित्य साधून सोसायटी मधील बालचमुनी भारताचे संविधान वाचन, गीते तसेच नृत्य सादर केले. सोसायटीचे अध्यक्ष अमोल गणपत गोरखे यांनी उपस्थित बालचमुचे कौतुक करून उपस्थित सोसायटी सभासदांचे (Akurdi) सेक्रेटरी निलेश जाधव यांनी आभार मानले.

सदर कार्यक्रम अमित बाबर, पंकज टाले, मिलींद पांडे, निलेश डोईजोडे, कल्याण कळपे, सेबी पॉल, अमन शेख, संजय शिळसाळकर, निलेश पटेल, निरंजन पटेल, सागर आंबेकर यांच्या सहभागातून कार्यक्रम संपन्न झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.