Today’s Horoscope 11 December 2021; जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग –
शनिवार.
११.१२.२०२१
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – दुर्गाष्टमी.
राहू काळ – सकाळी ०९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा २२.३२ पर्यंत नंतर उत्तराभाद्रपदा
चंद्र राशी – कुंभ १६.१७ पर्यंत नंतर मीन.
—————————————
आजचे राशीभविष्य
मेष -( शुभ रंग -राखाडी)
आज स्वार्था कडे लक्ष असू द्या. दानधर्म करताना स्वतःची शिल्लक तपासा. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळले तर बरे. दुपारनंतर एखादा मोठा खर्च उद्भवेल.

वृषभ- ( शुभ रंग – मरून )
आत्मविश्वासाने नवे उपक्रम राबवू शकाल. पैशाअभावी रखडलेली कामे सुरू करता येतील. लघु उद्योजकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता)
नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य राहिल.

कर्क (शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांची मते ऐकून घ्यायची तयारी ठेवा. उपासनेत खंड पडू देऊ नका.

सिंह (शुभ रंग -चंदेरी)
आज काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील. जरा डोके शांत ठेवण्याची गरज आहे. वाहन चालवताना डोक्यात विचारांची गर्दी नको.

कन्या- ( शुभ रंग- पांढरा)
आज नोकरीच्या ठिकाणी हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करून लवकर घर गाठाल. थोडी चंगळवादी व विलासी वृत्ती राहील. वैवाहिक जीवनात जोडीदार जे म्हणेल त्याला होच म्हणा.

तुळ – (शुभ रंग – नारिंगी)
व्यवसायात ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तुमची तयारी असेल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश निश्चित मिळणार आहे. आज तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा नको.

वृश्चिक -(शुभ रंग – सोनेरी)
नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. तुमची काही गुपिते उघड होतील. आज कामापुरतेच बोलणे हिताचे राहील.

धनु- (शुभ रंग- निळा )
आज अथक परिश्रम यांच्या साह्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. काही योग्य माणसे आज संपर्कात येतील. यश अगदीच हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल.

मकर -(शुभ रंग -आकाशी)
नकळत झालेल्या चुकीमुळे काही आर्थिक नुकसान होऊ शकेल. मुले आज अभ्यास सोडून सर्व काही करतील. विनाकारण शेजाऱ्यांच्या भानगडीत लक्ष घालू नका.

कुंभ – ( शुभ रंग -जांभळा)
अत्यंत आनंदी उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस असून. परिवारात सामंजस्य राहील.

मीन ( शुभ रंग- क्रीम)
आज रुग्णांनी पथ्य पाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून विश्रांतीस प्राधान्य द्या.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी
फोन- ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.