Todays Horoscope 21 December 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
आजचे पंचांग – वार – मंगळवार, दि. 21.12.2021
- शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
- आज विशेष – उत्तरायण आरंभ
- राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
- दिशा शूल – उत्तरेस असेल.
- आजचे नक्षत्र – पुनर्वसु 22.25 पर्यंत नंतर पुष्य
- चंद्र राशी – मिथुन 15.47 पर्यंत नंतर कर्क.
______________________
आजचे राशीभविष्य
मेष – (शुभ रंग- राखाडी)
कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवावी. कलाकारांना कामासाठी प्रतिक्षा करावी लागेल.
वृषभ- ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
आज महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकुन घेतलेली बरी. त्यानंतर थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्वाची मेल्स येणार आहेत. दुपारनंतर तातडीने प्रवासास निघाल.
मिथुन (शुभरंग- तांबडा)
तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. प्रभावी वक्तृत्वाने समोरच्या व्यक्तीस प्रभावित कराल.
कर्क – ( शुभ रंग – क्रीम)
महत्त्वाचे व्यावसायिक करार आज दुपारनंतर करावेत. काही हरवले असल्यास पुन्हा शोधा म्हणजे सापडेल. आज कुठेही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल.
सिंह – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्त्वपूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्यावेत. परदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होतील.
कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)
कार्यक्षेत्रात तुम्ही पूर्वी केलेल्या श्रमांचे चीज होईल व यश आता अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. क्षुल्लक कारणाने दुखावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.
तुळ – ( शुभ रंग- पांढरा)
विरोधकांचा विरोध कमी होईल. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. एखाद्या जिवलग मित्राच्या मदतीस धावून जाल. इतरांच्या भल्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल.
वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी)
आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी उद्भवतील. काही मानसिक संतुलन बिघडवणारे प्रसंग घडतील. संध्याकाळी सत्संगाकडे पावले वळतील. आजी-आजोबांना नातवंडांचा लळा लागेल.
धनु – (शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही कुणाचेही ऐकून घेण्याच्या तयारीत नसाल. काही क्षुल्लक गोष्टींनी मानसिक स्वास्थ्य बिघडेल. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळल्यात तर बरे होईल.
मकर – ( शुभ रंग- लाल)
कुटुंबातील काही आनंदी घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. प्रेम प्रकरणांना घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. आरोग्याची मात्र काळजी घ्यायला हवी. रुग्णांनी पथ्यपाणी सांभाळावे.
कुंभ- (शुभ रंग- पिस्ता)
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. आज काही गोड बोली माणसे भेटतील परंतु गाफील राहू नका. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश.
मीन – ( शुभ रंग- मोरपंखी)
काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. उद्योग-धंद्यात उत्साही वातावरण राहील. नोकरदारांना मात्र नोकरीत बदल करावासा वाटेल. आज मुले आज्ञाधारक पणे वागतील.