Today’s Horoscope 4 October 2022 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 4 October 2022 

वार – मंगळवार.

तारीख 04-10-2022

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष – नावरात्रोत्थपन, आयुध नवमी.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30

दिशा शूल- उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र- उत्तराशाढा 22.51 पर्यंत नंतर श्रवण.

चंद्र राशी- मकर.

————————-

आजचे राशिविष्य

मेष – शुभ रंग- पांढरा

आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल. इतरांच्या कामासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल. रखडलेली काही शासकीय कामे गती घेतील. कौटुंबिक समस्या दुर्लक्षित होतील.

वृषभ- शुभ रंग- आकाशी

कार्यक्षेत्रातील काही विरोधी घटनांनी तुम्हाला थोडे नैराश्य येईल. नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ जितके विचारतील तितकेच बोला. फार खोलात शिरून तुमच्याच अडचणी वाढतील.

मिथुन- शुभ रंग- निळा

कार्यक्षेत्रात नवे उपक्रम राबवण्यासाठी आजचा दिवस तितकासा अनुकूल नाही झटपट लाभाचा मोह तर टाळायलाच हवा. वैवाहिक जोडीदाराकडूनही फार अपेक्षा करू नका. जे चाललंय ते बर चाललंय.

कर्क- शुभ रंग- मरून

सगळीच महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून टाका. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. भागीदाराच्या व्यवहारात सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपात ठेवा.

सिंह -शुभ रंग- मोतिया.

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तुमची तब्येत थोडी नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका.वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस अजिबात थारा देऊ नका.

कन्या- शुभ रंग- स्ट्रॉबेरी.

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. दुपारनंतर काही बिकट प्रश्न सहजच सुटतील. शेअर बाजारातील तुमचे अंदाज आज अचूक ठरतील.

तूळ- शुभरंग- क्रीम.

व्यापार उद्योगास चांगली गती येईल महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आज आपल्याच मतावर ठाम राहाल. स्थावरची खरेदी विक्री फायद्यात राहील आज घर सजावटीस प्राधान्य द्याल.

वृश्चिक- शुभ रंग- भगवा

नवीन व्यावसायिकांनी मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. अति आत्मविश्वास ही आज नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम ठेवा.

धनु- शुभ रंग- राखाडी

आर्थिक व्यवहारात सावध असावे. आज आवक पुरेशी असली तरी अनावश्यक खर्च टाळा. दिवसाचे उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवणार आहे. वृद्धांनी डोळ्यांची काळजी घ्यावी.

मकर- शुभरंग- पिस्ता

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळायला हवा. वाहतुकीचे नियम पाळावेत.

कुंभ- शुभरंग- गुलाबी

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकलले तर बरे. आज संध्याकाळी जेष्ठांची पावले सत्संगाकडे वळतील.

मीन- शुभरंग- क्रीम

नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालू येतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. मोठ्या भावाचे सल्ले उपयुक्त ठरतील.

 

   शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.