Nigdi : ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाकडून शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाने डायरेक्टोरेट ऑफ एज्युकेशन, जीएनसीटीडी व डाएट/एससीआरटी यांच्या माध्यमातून दिली पब्लिक स्कूलच्या शारिरिक शिक्षकांसाठी १९ जून ते २३ जून या कालावधीत शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी क्षमता निर्माण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणासाठी ३८ क्रीडा शिक्षक आणि २ अधिकारी दिल्लीतून येथे आले आहेत व ते काही दिवस राहून प्रशिक्षण घेतील.

Talegaon : इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये साहसी दफ्तर विरहित दिवस संपन्न

आज या प्रशिक्षणाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आणि ज्ञान प्रबोधिनीचे शिक्षण समिती अध्यक्ष, निवृत्त आयकर आयुक्त डॉ. राजीव रानडे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी दिल्ली एससीआरटी अधिकारी राकेश कोठारी, सरला देवी, निवृत्त शिक्षण उपसंचालिका निरुपमा अभ्यंकर हे सर्व उद्घाटनाला उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांना स्पर्धात्मक खेळाचे महत्त्व सांगितले. पिं.चिं. मनपा राबवीत असलेल्या योजनांची माहिती सांगून विकसित शहरासाठी क्रीडा प्रकल्प व योजनांचे महत्त्व सांगितले. ज्ञान प्रबोधिनी संस्था मुलांचा सर्वांगीण विकास करणारी संस्था म्हणून प्रसिध्द आहे. खेळातील प्रशिक्षणासाठी त्यांनी शास्त्रशुध्द योजना, ‘ क्रिदाकुल ‘ ही गेली २५ वर्षे शहरात राबवली आहे.

माजी आयकर आयुक्त डॉ. राजीव रानडे यांनी त्यांच्या भाषणात प्रशिक्षकांना त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव करून दिली व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणात शिकलेल्या कौशल्याचा उपयोग नक्की करून द्यावा. तसेच पारंपरिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञान याचा सहयोग खेळात कसा करता येईल याबद्दलचा विचार मांडला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञान प्रबोधिनीचे शिक्षक प्रशिक्षण विभाग प्रमुख प्रशांत दिवेकर यांनी केले आणि निरुपमा अभ्यंकर यांनी प्रशिक्षणाविषयीची मांडणी केली. आगाशे कॉलेजचे प्राध्यापक डॉ. महेश देशपांडे यांची देखील उपस्थिती या कार्यक्रमास होती.
कार्यक्रमाचा समारोप ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाचे केंद्रप्रमुख आणि प्राचार्य मनोज देवळेकर यांनी केला. ते म्हणाले, ” क्रीडा क्षेत्रातील शिक्षकांनी आपल्या कामासाठी मार्गदर्शक विचार जोपासला पाहिजे. खेळ हे सर्वांनाच जीवनासाठी आवश्यक तत्वे-विचार शिकवितात . हार-जीत पचविणे, पराक्रम करणे, संघभावना हे सर्व खेळातूनच उत्तमपणे शिकविता येते”.

Pune : बेजबाबदारपणे दुचाकी चालवणे बेतले जिवावर; तरुणाचा जागीच मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.