Pune : बेजबाबदारपणे दुचाकी चालवणे बेतले जिवावर; तरुणाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : बेजबाबदारपणे दुचाकी चालवणे तरुणाच्या जिवावर (Pune) बेतले आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. युवराज अशोक कोंढरे असे मृताचे नाव आहे.

सहकारनगर येथे शुक्रवारी 16 जून रोजी पहाटे अडीचच्या सुमारास युवराज भरधाव वेगात दुचाकी चालवत आला. पादचाऱ्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले (Pune) आणि त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला धडकली. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

युवराजने ही गाडी दारू पिऊन चालवली की नाही याचा तपास सुरू आहे.

Pimpri : पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरु

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.