India News : सन 2025 पासून ट्रकच्या केबिन होणार एअर कंडीशन्ड

एमपीसी न्यूज – ट्रक वाहतूक कार्यक्षमतेने चालण्यासाठी ट्रकच्या केबिन एअर कंडीशन्ड करण्याचे बंधन सरकार घालणार आहे. सन 2025 पासून निर्माण होणाऱ्या ट्रकचे केबिन एअर कंडीशन्ड असेल अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. देश चालकया ट्रक चालकांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

Hinjwadi : शस्त्र परवाना काढून देण्याच्या बहाण्याने 35 लाखांची फसवणूक

देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्यात वाहतूक क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे. ट्रक वाहतूक कार्यक्षमपणे चालण्यासाठी ट्रकच्या केबिन एअर कंडीशन्ड होणे गरजेचे आहे. ट्रकच्या केबिनमध्ये गरम हवा असते. अशा परिस्थितीत ट्रक चालक काम करतात. याचा मालाच्या वाहतुकीवर देखील परिणाम होतो. या बाबीकडे आजवर फारसे लक्ष दिले गेले नाही.

मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “मी पूर्वीपासून ट्रक निर्मात्या कंपन्यांना केबिन एअर कंडीशन्ड असावी, असे सांगत आहे. त्यासाठी ट्रकचा खर्च वाढेल असे अनेकजण सांगतात. मात्र, या कार्यक्रमाला येण्यापूर्वी ट्रकची केबिन एअर कंडीशन्ड असावी या विषयावरील फाईलवर सही करून आलो आहे. त्यामुळे सन 2025 पासून निर्माण होणाऱ्या ट्रकच्या केबिन एअर कंडीशन्ड असतील.”

ट्रक चालकांच्या व्यवसायाकडे सन्मानाने पाहिले जात नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून अनेकजण हे काम स्वीकारतात. ट्रक चालकांची संख्या कमी असल्याने त्यांना 14 ते 16 तास काम करावे लागते. ट्रक चालकांचा तुटवडा कमी करण्यासाठी प्रशिक्षण संस्थांची गरज आहे. त्या दृष्टीकोनातून सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचेही गडकरी म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.