Hinjwadi : शस्त्र परवाना काढून देण्याच्या बहाण्याने 35 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शस्त्र परवाना काढून देण्याच्या बहाण्याने तिघांनी मिळून एका व्यक्तीची 35 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मे 2020 मध्ये बावधन येथे घडली.
मनोहर आबुराव दगडे (वय 49, रा. बावधन बुद्रुक) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 20) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राज उर्फ धनराज बाळू गायकवाड (वय 45, रा. लोहगाव, पुणे), मेघराज गायकवाड (वय 40, रा. लोहगाव, पुणे) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी राज याच्याशी बावधन येथे ओळख झाली. फिर्यादी यांच्या भावाच्या मुलांना शस्त्र परवाना काढून देण्याचे त्याने आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी बँक आणि रोख स्वरुपात 35 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन शस्त्र परवाना काढून न देता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
मनोहर आबुराव दगडे (वय 49, रा. बावधन बुद्रुक) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 20) हिंजवडी  (Hinjwadi) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राज उर्फ धनराज बाळू गायकवाड (वय 45, रा. लोहगाव, पुणे), मेघराज गायकवाड (वय 40, रा. लोहगाव, पुणे) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी राज याच्याशी बावधन येथे ओळख झाली. फिर्यादी यांच्या भावाच्या मुलांना शस्त्र परवाना काढून देण्याचे त्याने आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी बँक आणि रोख स्वरुपात 35 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन शस्त्र परवाना काढून न देता फसवणूक केली. हिंजवडी (Hinjwadi) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.