Chakan : महिलांविषयी अपशब्द वापरल्याने तरुणास मारहाण; पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – रिक्षातून जाताना एका प्रवाशाने महिलांविषयी (Chakan) अपशब्द वापरले. त्यावरून पाच जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या पाच जणांना दोन तासात पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. 20) सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील बिरदवडी फाटा येथे घडली.

वसीम नवीद बेग (वय 24), मयूर भगवान गालफाडे (वय 23), लक्ष्मण राम जोगदंड (वय 22), करण पांडुरंग सुरवसे (वय 20), रोहन अरुण बनसोडे (वय 21, सर्व रा. चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संजय सुरेश मिश्रा (वय 23, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : निराधार आजी-आजोबांसोबत शालेय विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात साजरा केला योग दिन

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खालुम्ब्रे येथे कोकाटे वडापाव या दुकानात संजय मिश्रा काम करतात. ते मंगळवारी सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास कामावरून घरी जात होते. खालुम्ब्रे येथून रिक्षात बसून जात असताना त्यांचा रिक्षातील सहप्रवाशी आरोपींसोबत वाद झाला.

त्यातून (Chakan) आरोपींनी फिर्यादी यांना वाकी खुर्द गावात नेले. तिथे फिर्यादीस शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादीकडील 20 हजार रोख रक्कम आणि 17 हजारांचा एक मोबाईल फोन आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतला.

या गुन्ह्याचा तपास महाळुंगे एमआयडीसी, चाकण, दिघी, तसेच गुन्हे शाखा युनिट चारने सुरु केला. पोलिसांनी दोन तासात पाच आरोपींना अटक केली. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. संजय मिश्रा यांनी महिलांबाबत अपशब्द वापरल्याने त्यांच्यात वाद झाल्याचे आरोपींनी सांगितले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.