Pune : निराधार आजी-आजोबांसोबत शालेय विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात साजरा केला योग दिन

एमपीसी न्यूज : आदिवासी (Pune) गावातील शालेय विद्यार्थ्यांनी सहारा वृद्धाश्रमात निराधार आजी-आजोबांसमवेत आज योग दिन साजरा केला.

आंदर मावळातील कुसवली या आदिवासी गावात पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक गोकूळ लोंढे, शिक्षिका संगीता ससाणे, केंद्र प्रमुख रघुनाथ मोरमारे यांनी योग दिन निराधार आजी-आजोबांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला.

PCMC : महापालिका अधिका-यांनी केला योगा

त्यानुसार येथील सहारा वृद्धाश्रमातील निराधार आजी आजोबांसोबत सर्वांनी हा जागतिक दिन साजरा केला.

या प्रसंगी योगाचे महत्त्व, आरोग्य साधना व भारताची प्राचीन संस्कृती याविषयी शिक्षकांनी सर्वांना मार्गदर्शन केले. वृद्धाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.