Vadgaon : गोकुळाष्टमी सप्ताहाची उत्साहात सांगता

एमपीसी न्यूज – श्री पोटोबा महाराज देवस्थान वडगाव मावळ येथील हनुमान मंदीरात गोकुळाष्टमी सप्ताहाची उत्सहात सांगता झाली. काकडा आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांनी 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत सप्ताह पार पडला. शुक्रवारी (दि. 8) काल्याच्या महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रथम दिवशी देवस्थान विश्वस्त मंडळ यांचे हस्ते अभिषेक, विणा पूजन होऊन कार्यक्रमांची सुरुवात झाली, तदनंतर रोजच्या पहाडीचे विणेकरी मान्यवर ग्रामस्थांनी आपला मान घेऊन संध्याकाळी हरिपाठ व रात्री काकडा आरती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम रोज संपन्न होत असे. बुधवारी दि 6 सप्टेंबर रोजी रात्री श्रीकृष्ण जन्म उत्सव, देव जन्माचे कीर्तन ह भ प बाबाजी महाराज काटकर यांचे संपन्न झाले.  गुरुवारी सायंकाळी दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला, आणि शुक्रवारी काल्याच्या महाप्रसादाने या कार्यकर्माची सांगता झाली.
महाप्रसादाचे नियोजन वडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब दामूशेठ म्हाळसकर  यांचे परिवाराचे वतीने करण्यात आले होते. संपूर्ण सप्ताहचे नियोजन देवस्थान मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त गणेशआप्पा ढोरे,अनंता कुडे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ॲड अशोक ढमाले, ॲड तुकाराम काटे, अरुण चव्हाण,तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे,यांसह काकडा आरती भजनी मंडळाचे शंकर म्हाळसकर,विणेकरी बबन भिलारे, सुदाम पगडे,पंढरीनाथ भिलारे, विठ्ठल ढोरे,मधुकर पानसरे,शिवाजी शिंदे, शिवाजी होणावळे,सोमनाथ ढोरे, नंदकुमार म्हाळसकर,संतोष ढोरे, आदींनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.