Vadgaon : मावळ गर्जना प्रतिष्ठानची दहीहंडी जल्लोषात साजरी

एमपीसी न्यूज – मावळ (Vadgaon) गर्जना प्रतिष्ठान वडगाव मावळ यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त (गुरुवारी, दि. 7) भव्य दहीहंडी स्पर्धा घेण्यात आली. राजे ग्रुप घाटकोपर, मुंबई यांनी दहीहंडी फोडून सहा लाख 66 हजार 666 रुपयांचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. रोख रकमेसह भव्य चषक देऊन पथकाचा सन्मान करण्यात आला. ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थान प्रांगणात हा सोहळा पार पडला.
या दहीहंडी सोहळ्यास शुभेच्छा व भेट देण्यासाठी श्रीरंगआप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा, सुनील आण्णा शेळके कार्यक्षम आमदार मावळ,  सचिन चिखले शहराध्यक्ष/गटनेते/समन्वयक मनसे पिंपरी चिंचवड, राजेंद्र म्हाळसकर संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ शिक्षण संस्था, प्रभाकर ओव्हाळ जेष्ठ साहित्यिक,  अरुण वाघमारे सचिव ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सायली बोत्रे अध्यक्षा भाजपा युवती महिला मावळ,रविंद्र भेगडे अध्यक्ष भाजपा मावळ, अंजली बवरे- मा ग्रामपंचायत सदस्या, पंढरीनाथ ढोरे मा. संचालक खरेदी विक्री संघ मावळ,अरुण चव्हाण, किरण भिलारे,अनंता कुडे,तुकाराम ढोरे, चंद्रकांत ढोरे,सुभाष जाधव आदी विश्वस्त पोटोबा देवस्थान, विजय सुराणा,गणेश विनोदे, बाळासाहेब वाघमारे,सुदेश गिरमे आधी पत्रकार तसेच नगरसेवक – वडगांव न.पं वडगाव नगरपंचायतीचे माजी नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, राहुल ढोरे, दिनेश ढोरे, राजेंद्र कुडे, किरण म्हाळसकर,दिलीप म्हाळसकर,मंगेश खैरे,रवींद्र म्हाळसकर,पूजा वहिले,अर्चना म्हाळसकर,सुनिता भिलारे,दिपाली मोरे,कुमार कदम पो.नि. वडगांव पो. स्टेशन, सुनिल शिंदे उद्योजक,मावळ मनसेचे पदाधिकारी सुरेश जाधव, अनंता तिकोणे, साहेबराव तेलगु, सूरज भेगडे, शोभा कळसकर,संगिता गुजर, अर्चना ढोरे, राजू भानुसघरे, रुपेश जाधव, गणेश भांगरेउपस्थित होते.
वडगाव तसेच मावळ तालुक्यातील हजारो नागरिक हा भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, लोणावळा येथील तब्बल 17 गोविंद पथकांनी नियोजनबद्ध, हर्षोल्हासात,जोशपूर्ण वातावरणात सहा /सात थरांचे मनोरे रचून दहीहंडी आणि उपस्थित प्रेक्षकांना सलामी देण्यात आली.
यावर्षीची दहीहंडी फोडण्याचा मान राजे ग्रुप घाटकोपर – मुंबई यांनी पटकावला. प्रशासनाच्या सूचनेनुसार रात्री 10:00 वा. दहीहंडी फोडण्यात आली आणि एकच जल्लोष झाला जय भवानी, जय शिवाजी, गोविंदा रे गोपाळा, बोल बजरंग बली की जय च्या जयघोषात आसमंत निनादला.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दहीहंडीचे व श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून प्रत्यक्ष दहीहंडी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी हंडीचे पूजन मयुर ढोरे मा. नगराध्यक्ष,रुपेश म्हाळसकर अध्यक्ष मनसे मावळ तालुका, सायली म्हाळसकर मा.उपनगराध्यक्ष,  सोपानराव म्हाळसकर मुख्य विश्वस्त पोटोबा देवस्थान, अवीकेंदू गुप्ता साहेब व्यवस्थापकीय संचालक वेट अँड जॉय आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी वडगाव (Vadgaon) मावळ पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रुपेश म्हाळसकर व सायली म्हाळसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन
तानाजी तोडकर ,ओंकार भांगरे यांनी केले तर विकास साबळे, दिनेश म्हाळसकर, महेंद्र शिंदे, संग्राम भानुसघरे, अजिंक्य शिंदे, शुभम म्हाळसकर, अनिल नायर, संतोष म्हाळसकर, नवनाथ शिवेकर, आकाश वारींगे,विक्रम कदम, जयंत कुंभार, गणेश मालपोटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन पार पडले. सागर शेलार,अरुण म्हाळसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
https://youtu.be/ymbqSdmZGtU?si=_NvNJL-k8TUesvaT

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.