Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांनी बदलत्या अध्ययन पद्धतीचा अंगीकार करावा – रो. सुरेश शेंडे

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील (Talegaon Dabhade) शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करणाऱ्या संत तुकाराम विद्यालय शिवणे येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने इयत्ता दहावी मधील 71 विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढ व्हावी म्हणून आयडियल स्टडी ॲपचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेत ज्ञानदानाचे काम करणाऱ्या गुरुजनांना शिक्षक दिनानिमित्त रोटरी सिटीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी ढोल लेझीमच्या गजरात वाजत गाजत रोटरी सिटीच्या मेंबर्सचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले सदर प्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करावा,स्पर्धेच्या युगात गुणवत्ता वाढ करण्यासाठी जी नवीन साधने आली आहेत.अध्यापनाच्या आणि अध्ययनाच्या नवीन पद्धती विद्यार्थ्यांनी आत्मसात कराव्यात असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष रो.सुरेश शेंडे यांनी करताना रोटरीच्या कार्याची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी शिकून खूप मोठे व्हावे,ज्ञान मिळवावे,शाळेचे व कुटुंबाचे नाव उज्वल करावे असे संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे यांनी मनोगताद्वारे विशद करताना शाळेला सर्वतोपरी मदत करू असे सांगितले.

अभ्यास कसा करावा,स्व वेळापत्रक, अध्ययन पद्धती इत्यादीचे महत्व प्रास्ताविकाद्वारे सेक्रेटरी रो.भगवान शिंदे यांनी विशद करताना उपक्रमाचा हेतू व उद्देश स्पष्ट केला.तर तज्ञ मार्गदर्शक वंदना खानविलकर यांनी आयडियल स्टडी ॲपचा वापर कसा करायचा याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डेमो करून दाखविला.
मान्यवर पाहुण्यांचे स्वागत व शाळेची माहिती मुख्याध्यापक सावळेराम गावडे यांनी दिली.सूत्रसंचालन रवींद्र शेळके यांनी केले गौरव प्राप्त शिक्षक यादीचे वाचन रो.प्रदीप टेकवडे यांनी केले आभार टिळे सर यांनी मानले.
सह प्रकल्प प्रमुख रो.मधुकर गुरव,रो.संजय मेहता,रो.संतोष परदेशी,रो विश्वास कदम,रो रामनाथ कलावडे,रो. दशरथ ढमढेरे, रो. सुनंदा वाघमारे इ.सह शाळेतील शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी (Talegaon Dabhade) विशेष परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.