Pimpri : अंमली पदार्थ पॉपी स्ट्रॉ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पॉपी स्ट्रॉ विक्रीसाठी आलेल्या (Pimpri ) दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 7) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास बावधन येथे करण्यात आली. आरोपींनी हा पॉपी स्ट्रॉ राजस्थान येथून पिंपरी चिंचवड शहरात विक्रीसाठी आणला होता.

रविप्रकाश सुखराम बिष्णोई (वय 37, रा. बावधन खुर्द. मूळ रा. राजस्थान), सुरेशकुमार साईराम बिष्णोई (वय 30, रा. हडपसर, पुणे. मूळ रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सोनू जालोरा, जयप्रकाश बिष्णोई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मितेश यादव यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाने आरोपी रविप्रकाश आणि सुरेशकुमार यांच्या ताब्यातून एक किलो 705 ग्रॅम वजनाचा अफू वनस्पतीच्या सुकवलेल्या बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) जप्त केला. आरोपींनी हा पॉपी स्ट्रॉ राजस्थान येथून सोनू जालोरा यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहरात जयप्रकाश याला विक्रीसाठी आणला होता. हिंजवडी पोलीस तपास करीत (Pimpri )आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.