Moroccan Earthquake : मोरोक्कोमध्ये भूकंपाचा कहर, मृतांची संख्या 1037 वर, 1200 लोक जखमी

एमपीसी न्यूज – मोरक्कोमधील भूकंपातील (Moroccan Earthquake) मृतांचा आकडा 1 हजार हून अधिक झाला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मोरक्कोच्या गृह मंत्रालयाने 820 लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. सहाशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे.

PCMC : महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती द्या; अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना

मोरक्कोला शुक्रवारी (8 सप्टेंबर) रात्री भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता 6.8 एवढी होती. मोरक्कोच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली. मोरोक्कोच्या उंच अशा ऍटलस पर्वराजींमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मार्राकेश शरहरापासून साधारण 71 किमी अंतरावर हा केंद्रबिंदू जमिनीच्या आत साडेअठरा किलोमीटर खोल होता, असं अमेरिकी भूगर्भ विभागानं म्हटलं आहे.

रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भूकंप आला. एक्सवर व्हायरल झालेल्या व्हीडिओंमध्ये इमारतींचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. बीबीसीने स्वतंत्र्यरित्या या व्हीडिओंची पुष्टी केलेली नाही. भूकंपानंतर लोक रस्त्यांवर पळापळ करताना दिसत आहेत.

मार्राकेश शहराच्या जुन्या भागात काही इमारतींचं नुकसान झालं आहे. परत भूकंप आला तर आमचा जीव जाऊ नये म्हणून आम्ही रस्त्यावरच राहत असल्याचं एका स्थानिकानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.